A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुप हा पिसा कसा

मधुप हा पिसा कसा सुवासा !
कमलिनि पाशा फसे अधिरसा ।
वांछितां विलासा ॥

हृदयीं मदन संचरला ।
व्याकुल करि जिवाला ।
तनु कांपे थर थर थर !
मनहंसा प्रणयसुख पिपासा ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - वझेबुवा
स्वर- अनंत दामले
नाटक - शिक्का-कट्यार
राग / आधार राग - मियां मल्हार
ताल-एकताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
पिपासा - तहान.
पिसे - वेड.
मधुप - भुंगा, भ्रमर.
वांच्छा - इच्छा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.