मागण्यास आलो जे
मागण्यास आलो जे विसरुनि ते गेलो
पण हृदयी फुलवात उजळुनि मी गेलो
ओंजळ ही शब्दांची, मिटलेल्या पाकळ्या
अनिलात मनगुज हे विखरुनि मी गेलो
कोणता ऋतू नभी पाहिले न पाहिले
दृष्टभेट होताना बहरुनि मी गेलो
वचनांचे शपथांचे ओझेही सरलेले
हरवून मीपण हे लहरुनि मी गेलो
पण हृदयी फुलवात उजळुनि मी गेलो
ओंजळ ही शब्दांची, मिटलेल्या पाकळ्या
अनिलात मनगुज हे विखरुनि मी गेलो
कोणता ऋतू नभी पाहिले न पाहिले
दृष्टभेट होताना बहरुनि मी गेलो
वचनांचे शपथांचे ओझेही सरलेले
हरवून मीपण हे लहरुनि मी गेलो
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आनंद भाटे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Print option will come back soon