मैनाराणी चतुर-शहाणी
मैनाराणी, चतुर-शहाणी, सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी
सिंह वनाचा असतो राजा, भीती त्याची चित्ती
वाघ वागतो भिऊन त्याला गुडघे टेकी हत्ती
अति चतुर पण कोल्हा कोणी सिंहा पाजी पाणी
कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
घरी बोलावून पाणउतारा करी पाहुण्याचा
कडीवरी त्या कडी करूनिया टोला कोल्हा हाणी
शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे आणी
कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी
सिंह वनाचा असतो राजा, भीती त्याची चित्ती
वाघ वागतो भिऊन त्याला गुडघे टेकी हत्ती
अति चतुर पण कोल्हा कोणी सिंहा पाजी पाणी
कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
घरी बोलावून पाणउतारा करी पाहुण्याचा
कडीवरी त्या कडी करूनिया टोला कोल्हा हाणी
शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे आणी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | बालगीत |