A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज भय न असा

मज भय न, असा शिरला वारा ॥

देवाजीचें काज खरोखर मी करीन,
हा माझा तोरा ॥

असतांना नव संचार मनीं,
कोण पुसे तुमच्या जोरा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- निर्मला गोगटे
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - द्रौपदी
राग - भैरवी
ताल-कवाली
चाल-मन मगन भया
गीत प्रकार - नाट्यसंगीत
काज - काम.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.