A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज एकसारखे स्वप्‍न सख्याचे

मज एकसारखे स्वप्‍न सख्याचे पडते
मी सुखद क्षणांची माळ अंतरी जपते

हा गंधित वारा गुज सांगतो गोड
लागली मनाला आज सख्याची ओढ
जळथेंब फुलावर त्यात सख्याला बघते

या प्रशांत समयी कोकिळ कूजन करिते
जात्यावर ओवी कुणी भाविका गाते
रविराज स्वागता उष:प्रभा ही नटते

बघ एकसारखी फडफडते पापणी
का हाक तयाची अवचित येते कानी
का संचित मजला जाण शुभाची देते
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.