मज सुचले ग मंजुळ गाणे
मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे
बोलाविन घुमती वाद्ये तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला हे कुण्या प्रभूचे देणे
आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे, सर्वांग तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले जन्माचे झाले सोने
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे
बोलाविन घुमती वाद्ये तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला हे कुण्या प्रभूचे देणे
आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे, सर्वांग तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले जन्माचे झाले सोने
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पाहूं रे किती वाट |
राग | - | अभोगी कानडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
Print option will come back soon