A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मजला कुठे न थारा

मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा!
करिते क्षणाक्षणाला दुर्दैव घोर मारा!

निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली
संसार-सागरी या ना सापडे किनारा!

वीणेवरी मनाच्या आघात जाहलासे
मांगल्य-भावनेच्या गेल्या तुटून तारा!