माझा होशिल का
सांग तू माझा होशिल का?
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकान्ती
एकान्ती कर कोमल माझा हाती घेशील का?
नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठां देशिल का?
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नाव गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का?
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकान्ती
एकान्ती कर कोमल माझा हाती घेशील का?
नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठां देशिल का?
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नाव गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | लाखाची गोष्ट |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Print option will come back soon