माझा पानमळा
माझा पानमळा पानमळा पानमळा
माझा पानमळा
इथुन तिथुन काळीशार होती धरणी
मी वाफे पाडून कांडे मोडून केली पेरणी
अंकुर कवळा
समद्या शिवारात जित्रापात मळा झुले
हा पंख पिसारुनी खुल्या मनी मोर डुले
माझा दील हरखला
धरतीची केली निगा कशी बघा देवापरी
कमी नाही दौलतीला, लक्षुमिला आणिन घरी
बढती माझ्या कुळा
या राव बसा तरि देतो घरी मुंबई खुडा
द्या घरधनिणीला रंगवायला ओठ कडा
घरी तुमचा पिकल मळा
माझा पानमळा
इथुन तिथुन काळीशार होती धरणी
मी वाफे पाडून कांडे मोडून केली पेरणी
अंकुर कवळा
समद्या शिवारात जित्रापात मळा झुले
हा पंख पिसारुनी खुल्या मनी मोर डुले
माझा दील हरखला
धरतीची केली निगा कशी बघा देवापरी
कमी नाही दौलतीला, लक्षुमिला आणिन घरी
बढती माझ्या कुळा
या राव बसा तरि देतो घरी मुंबई खुडा
द्या घरधनिणीला रंगवायला ओठ कडा
घरी तुमचा पिकल मळा
गीत | - | वि. म. कुलकर्णी |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
कांडे | - | पेर, तुकडा. |
जित्रा | - | पान गळलेले झाड. |