A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझाच हिंद देश

माझाच हिंद देश,
नाही दुजा कुणाचा !

हिंदी असेल त्याचा,
हा देव पूजण्याचा !

सेवेत देह लागो,
हृदयात धर्म जागो !

घेईन एक ध्यास,
माझाच हिंद देश !

जीवे फकिर व्हावे,
देशास उद्धरावे !

मानीन हाच मोक्ष,
माझाच हिंद देश !

स्वातंत्र्य लाभ व्हावा
सोन्यात तो नहावा !

जय जय करीन घोष
माझाच हिंद देश !
गीत -
संगीत -
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत