माझे जीवन गाणे
माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे
कधी ऐकतो गीत झर्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधी वार्यातुन, कधी तार्यांतुन झुळझुळतात तराणे
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही सुरांतुन उसळे प्रेम दिवाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे
कधी ऐकतो गीत झर्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधी वार्यातुन, कधी तार्यांतुन झुळझुळतात तराणे
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही सुरांतुन उसळे प्रेम दिवाणे
| गीत | - | मंगेश पाडगांवकर |
| संगीत | - | पु. ल. देशपांडे |
| स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
| राग / आधार राग | - | भूप, देसकार |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| विहंग | - | विहग, पक्षी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












पं. जितेंद्र अभिषेकी