माझे पुण्य फळा आले
माझे पुण्य फळा आले
आज मी दत्तगुरू पाहिले
शंख-चक्र करी विराजीत ते
पद्मकमंडलु हाती शोभते
भस्मांकित तनु गोजिरवाणी, यतिवेषे सजले
गळा माळ ती हाती झोळी
मुखकमलाची दिव्य झळाळी
स्वर्गसुखाची भेट आज ही धन्य जीवन झाले
दीनांचा गुरुराज दयाळू
भक्तांसाठी होत कृपाळू
जटाधारि परब्रह्म सावळे पाहुनी मन धाले
आज मी दत्तगुरू पाहिले
शंख-चक्र करी विराजीत ते
पद्मकमंडलु हाती शोभते
भस्मांकित तनु गोजिरवाणी, यतिवेषे सजले
गळा माळ ती हाती झोळी
मुखकमलाची दिव्य झळाळी
स्वर्गसुखाची भेट आज ही धन्य जीवन झाले
दीनांचा गुरुराज दयाळू
भक्तांसाठी होत कृपाळू
जटाधारि परब्रह्म सावळे पाहुनी मन धाले
गीत | - | नामदेव लोटणकर |
संगीत | - | आर. एन्. पराडकर |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा |
धाले | - | (धालेपण) तृप्ती. |
यति | - | संन्यासी. |