माझी बेगम आली
माझी बेगम आली, प्यारी.. माझी बेगम आली
मस्त मोंगली विलास सगळे उधळित ही भंवतालीं
डोळ्यांतुनि वाळ्याचें अत्तर हासत हासत जाळी
केश रेशमी, गाल मख्मली, अधरिं शराबी लाली
वचनीं बुलबुल, गायनिं कोकिळ, कवनीं पिक कुरवाळी
न्हाली ही शृंगाररसाने, प्रतिभालंकृति ल्याली
हासत, नाचत ये चंदेरी माझी गझल-कवाली
मम रक्ताची मैफल उडवी हृदयीं.. रंगमहालीं.

गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- २४ मे १९४१. |
कवन | - | काव्य. |
पिक | - | कोकिळ पक्षी. |