माझी देवपूजा पाय तुझे
माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ॥१॥
गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी ॥२॥
गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥
गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान ॥४॥
शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥
गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी ॥२॥
गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥
गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान ॥४॥
शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥
गीत | - | शिवदीन केसरी |
संगीत | - | आर. एन्. पराडकर |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा |
संध्या | - | दिवसातून तीन वेळा करण्याची (देवांची) उपासना. |