A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी माय सरसोती

माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन
झालं झालं, आपससूक
हिरिदात सूर्याबापा
दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानांमधी
देवा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी
दाये - दाखवे.
परम - परमय / परिमळ, सुवास.
माटी - माती.
सरसोती - सरस्वती.
सवादते - स्वाद देते.
हिरीद - हृदय.
मूळ रचना

माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपितं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन
झालं झालं, आपसूक
हिरिदात सूर्यबापा
दाये अरूपाचं रूप !

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानांमधी
देवा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी

फुलामधी समावला
धरत्रीचा परम
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?

किती रंगवशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात

धर्ती मधल्या रसानं
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.