माझिया नयनांच्या कोंदणी
माझिया नयनांच्या कोंदणी
उमलते शुक्राची चांदणी
तम विरते रात्र सरते
पहाटवारे झुळझुळते
प्राजक्ताचे तरू मोहरते
हृदयीच्या अंगणी
प्रहर पहिला आविरत येतो
भूपाळीचे स्वर गुणगुणतो
अरुण मनाचा हर्ष रंगतो
पूर्वेच्या लोचनी
दंवबिंबातुनी क्षण सोन्याचा
उजळत राही जीव जिवाचा
स्वर्ग हासतो वसुंधरेचा
किरणाकिरणांतुनी
उमलते शुक्राची चांदणी
तम विरते रात्र सरते
पहाटवारे झुळझुळते
प्राजक्ताचे तरू मोहरते
हृदयीच्या अंगणी
प्रहर पहिला आविरत येतो
भूपाळीचे स्वर गुणगुणतो
अरुण मनाचा हर्ष रंगतो
पूर्वेच्या लोचनी
दंवबिंबातुनी क्षण सोन्याचा
उजळत राही जीव जिवाचा
स्वर्ग हासतो वसुंधरेचा
किरणाकिरणांतुनी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | कन्यादान |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |
कोंदण | - | दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण. |
तम | - | अंधकार. |
वसुंधरा (वसुधा, धरा) | - | पृथ्वी. |