मी गाताना गीत तुला
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुन गा मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुन गा मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | आशा भोसले, रवींद्र साठे |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Print option will come back soon