माझ्या हाती माणिकमोती
माझ्या हाती माणिकमोती घालिते उखाणा खणखणाणा
जसा मोतियाचा दाणा माझा हा उखाणा खणखणाणा
पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे?
कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले?
खातो मोती पितो पाणी गातो हा दिवाणा, हा उखाणा..
(पोपट)
बुरख्यावर बुरखे बत्तीस बुरखे
देवाचे लाडके डोईवर झळके
हिरव्या रानी खाली पाणी स्वरूप सुंदर जाणा, हा उखाणा..
(कमळ)
एवढीशी आत्याबाई, राग तिला येई
तोंडाशी लागते, पाणी डोळ्या आणते
बांधा छोटा रुबाब मोठा घालिते धिंगाणा, हा उखाणा..
(मिरची)
जसा मोतियाचा दाणा माझा हा उखाणा खणखणाणा
पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे?
कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले?
खातो मोती पितो पाणी गातो हा दिवाणा, हा उखाणा..
(पोपट)
बुरख्यावर बुरखे बत्तीस बुरखे
देवाचे लाडके डोईवर झळके
हिरव्या रानी खाली पाणी स्वरूप सुंदर जाणा, हा उखाणा..
(कमळ)
एवढीशी आत्याबाई, राग तिला येई
तोंडाशी लागते, पाणी डोळ्या आणते
बांधा छोटा रुबाब मोठा घालिते धिंगाणा, हा उखाणा..
(मिरची)
गीत | - | अनिल भारती |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | बालगीत |
Print option will come back soon