माझ्या प्रीतीच्या पांखरा
          माझ्या प्रीतीच्या पांखरा रानभरी होऊ नको
माझ्या जिवाच्या मैतरा, देशांतरा जाऊ नको
जीवा घायाळ करीत आल्या पावसाच्या धारा
भांबावून वेड्यापरी झाला वेडापिसा वारा
पिसाट या वार्यासंगे दूर दूर वाहू नको
विसाव्याच्या वनराया किती कुंद कुंद झाल्या
गंध झोकुनी मातीचा दाही दिशा धुंद झाल्या
वेध लागुनी अनोखा टकामका पाहू नको
चोच घालुनी चोचीत खूणगांठ पटवावी
एकमेकांनी कुशीत देणीघेणी मिटवावी
घडीभराचा दुरावा विकोपाला नेऊ नको
          माझ्या जिवाच्या मैतरा, देशांतरा जाऊ नको
जीवा घायाळ करीत आल्या पावसाच्या धारा
भांबावून वेड्यापरी झाला वेडापिसा वारा
पिसाट या वार्यासंगे दूर दूर वाहू नको
विसाव्याच्या वनराया किती कुंद कुंद झाल्या
गंध झोकुनी मातीचा दाही दिशा धुंद झाल्या
वेध लागुनी अनोखा टकामका पाहू नको
चोच घालुनी चोचीत खूणगांठ पटवावी
एकमेकांनी कुशीत देणीघेणी मिटवावी
घडीभराचा दुरावा विकोपाला नेऊ नको
| रानभरी | - | अशांत. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !