माझ्या रे प्रीतीफुला
माझ्या रे प्रीतीफुला, ठेवू मी कोठे तुला
मिरवू माथी का तुला मी, दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे उघड सार्या निंदका
काळजाचा कंद तू रे रंग डोळ्यांतला
अधीर हळवे दोन डोळे, पुष्पपात्रें ही निळी
ठेविसी तेथे फुला तू, फुलत जाते पाकळी
भोवताली गंध दाटे धुंद चैत्रातला
तूच नयनी तूच हृदयी, तूच असशी जीवनी
काळ जाई कळत नाही दिवस किंवा यामिनी
आणलासे काय संगे गंध स्वर्गातला
मिरवू माथी का तुला मी, दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे उघड सार्या निंदका
काळजाचा कंद तू रे रंग डोळ्यांतला
अधीर हळवे दोन डोळे, पुष्पपात्रें ही निळी
ठेविसी तेथे फुला तू, फुलत जाते पाकळी
भोवताली गंध दाटे धुंद चैत्रातला
तूच नयनी तूच हृदयी, तूच असशी जीवनी
काळ जाई कळत नाही दिवस किंवा यामिनी
आणलासे काय संगे गंध स्वर्गातला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | आधार |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
यामिनी | - | रात्र. |