A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माज्या मुखार गर्भच्छाया

माज्या मुखार गर्भच्छाया, कुशीक जाले ओझे
तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे !

फुलून येता चाफेकळी मनाक येता बहर
ओठावयल्या अमृताचे होते बाय जहर
जरीपदर उडून जाता जीव मरता लाजे
तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे !

देवाची गो नोवरी तिचो पाषाणाचो पती
घर नाही दार नाही संसाराची माती
सौभाग्याचा फास तिच्या गळ्यामधे साजे
तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.