माळ-पदक विठ्ठल विसरला
माळ-पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
आला आळ जनीवरी, केली पदकाची चोरी
चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला
दंड-काढण्या लाविल्या, जनी जाते सूळावरी
जनी म्हणे पांडुरंगा, वृथा आळ माझ्यावरी
नाही आम्ही जगी केली तुझ्या पदकाची चोरी
तोच धावला संकटी, पांडुरंग जगजेठी
झाले पाणी सुळाचे ग, धन्य जनी धन्य हरी
आला आळ जनीवरी, केली पदकाची चोरी
चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला
दंड-काढण्या लाविल्या, जनी जाते सूळावरी
जनी म्हणे पांडुरंगा, वृथा आळ माझ्यावरी
नाही आम्ही जगी केली तुझ्या पदकाची चोरी
तोच धावला संकटी, पांडुरंग जगजेठी
झाले पाणी सुळाचे ग, धन्य जनी धन्य हरी
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | बाळ माटे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
आळ | - | आरोप. |
काढणी | - | बळकट दोरी. |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |