A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला आणा एक हिर्‍याची

माझ्या शेजारी येउन बसता
हवंनको काहीच ना पुसता
तुम्ही नुसतेच गालांत हसता
नको फुकाची साखरपेरणी
मला आणा एक हिर्‍याची मोरणी !

नव्या नवतीत पहिलीवहिली
पोरपणाची हौस माझी राहिली
इतके दिवस वाट मी पाहिली
जीव नुसताच लावलाय झुरणी
मला आणा एक हिर्‍याची मोरणी !

एक सोन्याचं कोंदण घडवा
मधी लाखाची हिरकणी जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा
करून थकले तुमची मनधरणी
मला आणा एक हिर्‍याची मोरणी !
कोंदण - दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण.
नवती - तरुणी / तारुण्य / नवी पालवी.
मोरणी - स्‍त्रियांचा नाकात घालायचा एक अलंकार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.