मला इष्काची इंगळी डसली
मी एकलीच निजले, रातीच्या अंधारांत,
नको तिथंच पडला अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली
ग बाई मला, इष्काची इंगळी डसली
बाई ग, बाई ग
मारली किंकाळी, कळ लई आली
उरी घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली
सार्या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली
ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावाणी मी घातला पिंगा
मंतर घाला हलका हलका
नार चुकून फसली
नको तिथंच पडला अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली
ग बाई मला, इष्काची इंगळी डसली
बाई ग, बाई ग
मारली किंकाळी, कळ लई आली
उरी घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली
सार्या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली
ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावाणी मी घातला पिंगा
मंतर घाला हलका हलका
नार चुकून फसली
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | पिंजरा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
काहिली | - | उकाडा / आग / तळमळ. |