A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला म्हाएरी करमत न्हाई

कसं कुणाला सांगू ग बाई
मला म्हाएरी करमत न्हाई !

माझं म्हाएर गोजिरवाणं
ततं मायेचं पिकतंय सोनं
हळी देत्यात ढवळ्या गाई
तरी, म्हाएरी करमत न्हाई !

मी करते वेणीफणी
ततं नसंल उठलं कुणी
चैन जिवाला माझ्या ग न्हाई
मला म्हाएरी करमत न्हाई !

मी भाकर करते जवा
लई आठव येतो तवा
चुलीपाशी बी चावट घाई
मला म्हाएरी करमत न्हाई !
हळी (हाळी) - आरोळी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.