मला न कळते सारेगम
मला न कळते सारेगम- गाण्याचे संगीत
मी गातो बडबड गीत
बडबड बडबड गीत
जमवून सारी वेडी पोरं, टप टप पाडून कैर्या-बोरं
खुशाल बसतो फांदीवरती नाही कुणाला भीत
ओढा गाई झुळझुळ गाणी, कोकिळ गाई अमृतवाणी
आम्ही गातो त्यांच्यासंगे तीही होती धीट
कधी पाखरे होऊन फिरतो, कधी आईच्या कुशीत शिरतो
बाळपणीचा काळ सुखाचा हीच आमुची रीत
मी गातो बडबड गीत
बडबड बडबड गीत
जमवून सारी वेडी पोरं, टप टप पाडून कैर्या-बोरं
खुशाल बसतो फांदीवरती नाही कुणाला भीत
ओढा गाई झुळझुळ गाणी, कोकिळ गाई अमृतवाणी
आम्ही गातो त्यांच्यासंगे तीही होती धीट
कधी पाखरे होऊन फिरतो, कधी आईच्या कुशीत शिरतो
बाळपणीचा काळ सुखाचा हीच आमुची रीत
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | |
स्वर | - | सुशांत रे, शारंग देव |
गीत प्रकार | - | बालगीत |
Print option will come back soon