A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला सांगा सुख म्हणजे नक्की

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं !

दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय? नको ! ते म्हणणं प्रश्‍नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.