A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माळते मी माळते

माळते, माळते!
माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते!

टपटप धरणी वरती
सांडून गेले घुंगुर अवतीभवती
या धारांना, या धारांना
या धारांना छातीस कवटाळिते!

सरसर या सरीखाली
रुजेन बाई मी तर ओली ओली
या दंडावरी, या दंडावरी
या दंडावरी जणू गाणे रोमांचते!

उतरले बालपण माझे हे खालती, खालती
या आईला, या आईला
या आईला फुटले पान्हे किती
आकाशीच्या या काचेच्या
या काचेच्या चांदण्यास मी चुंबिते!
गीत- चंद्रकांत खोत
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - वाणी जयराम
चित्रपट- यशोदा
गीत प्रकार - चित्रगीत ऋतू बरवा