A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मल्मली तारुण्य माझे

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे !

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे !

तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे !

रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी..
मी तुला जागे करावे ! तू मला बिल्गून जावे !
गीत - सुरेश भट
संगीत - सी. रामचंद्र
स्वर- आशा भोसले
चित्रपट - घरकुल
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.