मन माझे भुलले
मन माझे भुलले
वनराईच्या पानामधुनी
काल तुला पाहिले
बकुळफुलांची गुंफुनी वेणी
नदीकाठी तू उभी साजणी
अवचित मी देखिले
अंतरीचे गीत उमगले
शतजन्मीचे नाते जुळले
वचन तुला दिधले
वनराईच्या पानामधुनी
काल तुला पाहिले
बकुळफुलांची गुंफुनी वेणी
नदीकाठी तू उभी साजणी
अवचित मी देखिले
अंतरीचे गीत उमगले
शतजन्मीचे नाते जुळले
वचन तुला दिधले
गीत | - | वीणा चिटको |
संगीत | - | वीणा चिटको |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, भावगीत |