मंदिरात अंतरात तोच (२)
मंदिरात अंतरात
तोच नांदत आहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
तोच उन्हाची काहिली
तोच शीतळ साउली
आनंदात वेदनांत अंति तोच आहे
कुठे सुखाचा वर्षाव
कुठे घावावरती घाव
तारणारा मारणारा एक तोच आहे
तोच नांदत आहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
तोच उन्हाची काहिली
तोच शीतळ साउली
आनंदात वेदनांत अंति तोच आहे
कुठे सुखाचा वर्षाव
कुठे घावावरती घाव
तारणारा मारणारा एक तोच आहे
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | धाकटी सून |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
काहिली | - | उकाडा / आग / तळमळ. |