मनीं माझिया नटले गोकुळ
मनीं माझिया नटले गोकुळ
मी राधा तू कान्हा प्रेमळ
वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी
खट्याळ हसते कालिंदीजळ
मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी मज धरुनी हाती
खुशाल लुटिसी दहीदुधलोणी
गोपसख्या तू भारी अवखळ
यमुनाकाठी रास रंगतो
रमतो आपण, मीपण हरतो
अंध जगाला कशी दिसावी
अपुली प्रीती, अपुले गोकुळ?
मी राधा तू कान्हा प्रेमळ
वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी
खट्याळ हसते कालिंदीजळ
मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी मज धरुनी हाती
खुशाल लुटिसी दहीदुधलोणी
गोपसख्या तू भारी अवखळ
यमुनाकाठी रास रंगतो
रमतो आपण, मीपण हरतो
अंध जगाला कशी दिसावी
अपुली प्रीती, अपुले गोकुळ?
गीत | - | कवी सुधांशु |
संगीत | - | वसंत आजगांवकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत, मना तुझे मनोगत |
कालिंदी | - | यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते. |