रायगडावर माय हिरकणी
रायगडावर माय हिरकणी अजून हो साकार
कथेला शब्दांविण आकार
सांज ही सरली, रतीब संपला
बाळ भुकेने घरी व्याकुळला
बंद तटातून जाऊ न देती तिजला किल्लेदार
थिजली माता, भिजले लोचन
बाणासम ती जाय तमातून
कड्यावरून घे उडी भाबडी करूनिया निर्धार
शिवरायाला कळे कहाणी
धन्य हिरकणी म्हणती जननी
रायगडावर अजून सांगतो बुरूज कथेचे सार
कथेला शब्दांविण आकार
सांज ही सरली, रतीब संपला
बाळ भुकेने घरी व्याकुळला
बंद तटातून जाऊ न देती तिजला किल्लेदार
थिजली माता, भिजले लोचन
बाणासम ती जाय तमातून
कड्यावरून घे उडी भाबडी करूनिया निर्धार
शिवरायाला कळे कहाणी
धन्य हिरकणी म्हणती जननी
रायगडावर अजून सांगतो बुरूज कथेचे सार
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |