मानिली आपुली तुजसि मीं
मानिली आपुली तुजसि मीं एकदां ।
दुःख शोक न कदा शिवुत तुजलागि तें ॥
वंचिलें त्वां जरि हितचि तव वांच्छितों ।
वरुनि सन्मार्ग तो धरिं सदा सुमतिते ॥
कष्ट जरि सोशितां वच न ये मोडितां ।
म्हणुनि जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥
दुःख शोक न कदा शिवुत तुजलागि तें ॥
वंचिलें त्वां जरि हितचि तव वांच्छितों ।
वरुनि सन्मार्ग तो धरिं सदा सुमतिते ॥
कष्ट जरि सोशितां वच न ये मोडितां ।
म्हणुनि जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वराविष्कार | - | ∙ पं. वसंतराव देशपांडे ∙ सुरेश हळदणकर ∙ पं. राम देशपांडे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | संशयकल्लोळ |
राग | - | खमाज |
चाल | - | क्षण एक जो |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
वांच्छा | - | इच्छा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.