A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनोगतांचे उंच मनोरे

मनोगतांचे उंच मनोरे सांग कुणी रचिले
आज लोचनी संसाराचे स्वप्‍न मला दिसले

ही वळणाची वाट असावी हिरव्या कुरणावरी
फुलझाडांवर रोज उडाव्या कारंजाच्या सरी
उभे मधोमध एक सानुले घरकुल माझे वसले

सखा सोबती जवळ बसावा एकान्‍ती येउनी
अंग चोरुनी दूर उभी मी बावरलेल्या मनी
या भेटीच्या आभासाने खुदकन मी हसले

या चित्राचे रंग भरावे तूच आपल्या हाती
याच घडीला अशा जुळाव्या अपुल्या रेशीमगाठी
माझ्या पुढती इंद्रपुरीचे सुख कोठे, कसले?