A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मंत्र वंदे मातरम्‌ हा

या कळ्यांनो या फुलांनो, या मुलांनो या जरा
मंत्र 'वंदे मातरम्‌' हा घोष गर्जा अंबरा !

आणिले स्वातंत्र्य आम्ही झुंजुनी शत्रूसवे
हाती तुमच्या देतसे ते शुभ नव्या भाग्यासवे
रक्षणे स्वातंत्र्य आता कार्य हे इतुके करा
मंत्र वंदे मातरम्‌ !

राहू द्या बंदूक तुमची सज्ज त्या शत्रूवरी
लक्ष असू द्या आईसम या थोर त्या शेतावरी
मातीतून त्या मोती पिकवा येऊ द्या लक्ष्मी घरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

शिवप्रभुचा लाभला हा आज तुम्हा वारसा
टिळक-गांधी-शास्त्री यांचा जीवनाचा आरसा
नेहरू अन्‌ इंदिराही सांगती या सागरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.