मथुरेत मी गोकुळी कान्हा
आवरिले मी नयनी आसू
कसा आवरू उरिचा पान्हा
मथुरेत मी गोकुळी कान्हा !
कुठे तान्हुले कुठे माउली
कुठे वासरू कुठे गाउली
त्यात शृंखला अशा पाउली
कशी जाउ मी, पाहू तान्हा?
बसल्या ठायी बसून पाहते
चंद्रबिंब हळूहळू वाढते
असेल झाले बाळ रांगते
म्हणेल आई तेथे कोणा?
स्वर्गाहुनिया ज्याची थोरी
ते सांगाया जगात चोरी
जाणशील का बाळा तू तरि?-
तुझ्याचसाठी याहि यातना
कसा आवरू उरिचा पान्हा
मथुरेत मी गोकुळी कान्हा !
कुठे तान्हुले कुठे माउली
कुठे वासरू कुठे गाउली
त्यात शृंखला अशा पाउली
कशी जाउ मी, पाहू तान्हा?
बसल्या ठायी बसून पाहते
चंद्रबिंब हळूहळू वाढते
असेल झाले बाळ रांगते
म्हणेल आई तेथे कोणा?
स्वर्गाहुनिया ज्याची थोरी
ते सांगाया जगात चोरी
जाणशील का बाळा तू तरि?-
तुझ्याचसाठी याहि यातना
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | देवबाप्पा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
Print option will come back soon