A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माया जळली का

माया जळली का । तिळही ममता नाहीं का ।
आली पोटीं पोर एकटी, तीही विकितां का ॥

लाजहि गेली का । मतिला भ्रमही पडला का ।
शोभा करितील लोक तयाची, चाडहि नाहीं का ॥

द्रव्यचि बघतां का । तिजला पतिसुख न लगे का ।
वृद्धा देउनि तिला वांझपण, विकतचि घेतां कां ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
राग - मांड
ताल-दादरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
चाड - शरम.
मति - बुद्धी / विचार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.