A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मायेचा निजरूप आईचा

मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडला
गोंधळ मांडिला द्येवा गोंधळाला यावं

उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई

मोरेश्वर गडा गोंधळा यावे
वाईच्या गणपती गोंधळा यावे
कोल्हापूरची लक्ष्मी, पुण्याची पर्वती, सातारची मंगळाई गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

कृष्णा-कोयनामाई गोंधळा यावे
तुळजापूरची भवानी गोंधळा यावे
पसरणीच्या भैरीदेवा, नाशिकच्या काळ्या रामा, फलटणच्या रामा तुम्ही गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

म्हसवड सिद्धा गोंधळा यावे
रत्‍नागिरी जोतिबा गोंधळा यावे
करंदी येळुबाई, कवठ्याची यमाबाई, जुन्‍नरची शिवाबाई गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे

वाडे-घोड्याची गोलाई गोंधळा यावे
साती समिंदरा गोंधळा यावे
नवलाख तारांगणा गोंधळा यावे
भरतारी माता नि आगाशी पिता नि र्‍हाहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा
तेहतीस कोटी देवा गोंधळा यावे

गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
उदे उदे उदे उदे..

अंबाबाईच्या नावानं गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
अहो कारणा कारण आम्ही गोंधुळ मांडिला
गोंधळ मांडिला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे..

देवा कारणं भक्ता कारणं गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
कुलस्वामिनी पूज्य देवता गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
पूजा कारणं नमला लागून गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे..

डोंगराईच्या नावानं हो गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला न्‌ देवा गोंधळा यावे
कुलस्वामिच्या नावानं हो गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला न्‌ देवा गोंधळा यावे
यमाईच्या नावानं आम्ही गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला न्‌ देवा गोंधळा यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे..

पूजा कारणं भक्त धावला, गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
जुड्याजुड्यानं राज्य करावं, गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
तुम्हा कारणं नम्र होउन गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे..

चोळी-पातळ-लिंबू-नारळ गोंधळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
देवीच्या पूजेला बघा भगत धावला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
भगता कारणं आम्ही गोंधुळ मांडला
गोंधळ मांडला न्‌ देवा गोंधळाला यावे
आम्ही गोंधळी गोंधळी
अंबेचे गोंधळी हो अंबेचे गोंधळी
उदे उदे उदे उदे..

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.