मीच माझ्या धामी रामा
मीच माझ्या धामी रामा बंदिवान झालो
सख्यासोयर्यांच्या बेड्या हातीपायी ल्यालो
दुरावले सज्जन सारे, निंदतात पोरेसोरे
घोट अमृताचा म्हणुनी चढी भांग प्यालो
बंद करून खिडक्यादारे, मीच कोंडले रे वारे
फास घेउनी मायेचा, जितेपणी मेलो
आता समर्था रे बापा, तूच जाळ पापातापा
नादरूप पस्तावा मी, तुझ्या पदी आलो
सख्यासोयर्यांच्या बेड्या हातीपायी ल्यालो
दुरावले सज्जन सारे, निंदतात पोरेसोरे
घोट अमृताचा म्हणुनी चढी भांग प्यालो
बंद करून खिडक्यादारे, मीच कोंडले रे वारे
फास घेउनी मायेचा, जितेपणी मेलो
आता समर्था रे बापा, तूच जाळ पापातापा
नादरूप पस्तावा मी, तुझ्या पदी आलो
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | |
चित्रपट | - | जावई माझा भला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |