A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मेघासम हा श्याम सावळा

मेघासम हा श्याम सावळा
आणि राधिका बिजली
अशी ग रासक्रीडा रंगली
रंगल्या गोकुळच्या गौळणी

गोपगोपिका टिपरी घेवुनी
पैंजण-नादे धुंद होउनी
नाचतात ग गीत गावुनी
कळली नाही नभी कशी ग
चंद्रकोर कलली !

सप्तसुरांच्या बासरीवरी,
नाचत राही वसुधा सारी
लचकत मुरकत राधा प्यारी
चमकत चमकत बिजलीसम ती
श्यामनयनी लपली !
वसुंधरा (वसुधा, धरा) - पृथ्वी.