A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मेंदीच्या पानांवर

मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतेऽ ग
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलतेऽ ग

झुळझुळतो अंगणात तोच गार वाराऽ ग
हुळहुळतो तुळशीचा अजून देह साराऽ ग

अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळेऽ ग
अजून तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळेऽ ग
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.