A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
म्हण भाबडी म्हण

म्हण भाबडी म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली

जिवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासांमाजी श्वास मिसळुनी
रूळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी

तव बाहुंच्या क्षितिजामधले
जग दोघांचे मीच निर्मिले
डोळस माझे प्रेम आंधळे
जडले मन रे पडले गळी

पुरुष जातही फसवी बाई
म्हणणारे कुणी म्हणोत काही
फसव हवे तर तूच मलाही
उडी घेतली मोहजळी
गीत - पी. सावळाराम
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर- आशा भोसले
चित्रपट - माय माउली
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.