A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
म्हातारा नवरा गमतीला

मनात हाय आता सांगूच काय ग
कशी काय येऊ मी रंगतीला?
म्हातारा नवरा गमतीला

मी नवतरणी आले भरात
कसंतरी होतंय माझ्या ऊरात
हा बैलबश्या, करील हशा
राहू कशी बाई याच्या संगतीला?
कसं काय येऊ मी रंगतीला?
म्हातारा नवरा गमतीला

फिरवेना कधी तो प्रेमाचा हात
हा नुसताच दावतोय नवर्‍याचं नातं
काढुनी कळ, दावितो बळ
शोभंल का माझ्या पंगतीला?
कसं काय येऊ मी रंगतीला?
म्हातारा नवरा गमतीला

इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
नको अशी साथ, जोडिते हात
जाळू का मी माझ्या नवतीला?
कसं काय येऊ मी रंगतीला?
म्हातारा नवरा गमतीला
नवती - तारुण्याचा भर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.