सजणी ग भुललो मी
सजणी ग भुललो मी, काय जादू झाली
बघून तुला जीव माझा होई वर-खाली
सजणा रं काय सांगू कुणी जादू केली
लाज मला आली बाई, लाज मला आली
काल मला ह्याची बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतिया कशी लाजाळूची वेली
अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली
लपंना ही हुरहुर आज पदरी
शालू-चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
बघून तुला जीव माझा होई वर-खाली
सजणा रं काय सांगू कुणी जादू केली
लाज मला आली बाई, लाज मला आली
काल मला ह्याची बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतिया कशी लाजाळूची वेली
अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली
लपंना ही हुरहुर आज पदरी
शालू-चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | उषा मंगेशकर, महेंद्र कपूर |
चित्रपट | - | भिंगरी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
गरती | - | कुलीन स्त्री. |
नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |