A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी डोलकर डोलकर

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान्‌ गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा
नथ नाकानं साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा
कवा उदानवारा शिराला येतंय फारू
कवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशी चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात व्होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
डाली - पसरट पाटी.
डोलकर - नाविक, नाव / होडी चालवणारा.
नाखवा - जहाजावरचा मुख्य नावाडी, तांडेल.
भर्तार (भर्ता) - नवरा, पती / स्वामी.
रापणे - भिजू देणे.

 

  लता मंगेशकर, हेमंतकुमार