मी एकटाच होतो
मी एकटाच होतो, होतो अबोल झालो
क्षण पाहता तुला मी, माझा न मीच उरलो
उन्मत्त वेदनेला फुटले निळे धुमारे
उध्वस्त या मनाला दिसले नवे किनारे
तू बोललीस तेव्हा हरवून मीच गेलो
स्मितातुनी तुझ्या ग होती पहाट फुलली
आरक्त जाणिवांची होती फुले उमलली
नेत्रास नेत्र मिळता मी जायबंदी झालो
क्षण पाहता तुला मी, माझा न मीच उरलो
उन्मत्त वेदनेला फुटले निळे धुमारे
उध्वस्त या मनाला दिसले नवे किनारे
तू बोललीस तेव्हा हरवून मीच गेलो
स्मितातुनी तुझ्या ग होती पहाट फुलली
आरक्त जाणिवांची होती फुले उमलली
नेत्रास नेत्र मिळता मी जायबंदी झालो
| गीत | - | |
| संगीत | - | |
| स्वर | - | रवींद्र साठे |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| उन्मत्त | - | माजलेला, दांडगा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












रवींद्र साठे