A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विसरशील खास मला

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे वचन आठवीता

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा