A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी गुणगुणते अबोध काही

मी गुणगुणते अबोध काही बोल
डोलतो उरी हिंडोल !

कळी कळी उमलुनी आली
तारका उतरल्या खाली
हिरवाळ दंवाने न्हाली
करी घमघमता पारिजातही डोल !

ओठांचा उघडे पडदा
ये अस्फुट दिड्‌दा दिड्‌दा
विस्तार स्वरांचा उमदा
या गीताचा अर्थ मनाहून खोल !

हे मनोगताचे गीत
शब्दांच्या पार अतीत
जाणते एक या प्रीत
ती प्रीती दे यास लाजरा ताल !
अतीत - पलीकडे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.