मीही सुंदर तूही सुंदर (२)
मीही सुंदर, तूही सुंदर, आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर, जे जे दिसते ते ते सुंदर
निळेभोर आभाळ मोकळे
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले, अमृतरसाचे सांडती पाझर
धाव मोहना, धाव लौकरी
अनंतामधे मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले, सर्वांगाला पंख उगवले
सौंदर्याचा पहा उसळला जिकडेतिकडे अथांग सागर

गीत | - | प्र. के. अत्रे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पुष्पा मराठे |
चित्रपट | - | चोरावर मोर |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Print option will come back soon